प्रिय ऋचास….

To that best friend of mine who stood by me in my life altering years…

विस्तीर्ण नभाच्या अंगणी मन हे होते बावरले
क्षितिजावरती नव्या दिशांचे रंग होते फटफटले

संचित अलगद ठेऊन गेले हात तव माझे हाती
नव्या वाटा, दिशा नव्या क्षण हे सारे मोहरती

दंगामस्ती खेळगाणी सारा प्रवास होता  गंमतीचा
चैतन्याचा, उत्साहाचा, आणि सदोदित प्रसन्न हास्याचा

रडवणारे क्षणही होते नवीन धडे गिरवायला
आयुष्य आपले घडवायला, दुनियादारी शिकवायला

फुलपाखरांच्या आठवणी आपल्या
रंग मागे ठेवून जातात
रंगाची किमया असते सारी
पापण्या हलकेच पाणावतात

तुझ्या साथीने आयुष्याची उलगडली पाने सोनेरी
सर्व काही मिळो तुला घे तू उंच भरारी
काळ उभा घेऊन पुढे प्रश्न भविष्यासारखे
अखंड तुझी साथ देऊ अशीच रहा सखे…

Advertisements

14 thoughts on “प्रिय ऋचास….

 1. इतके सुंदर शब्द लिहिणारी मैत्रीण असेल तर का नाही कोणी आयुष्यभर मैत्री निभवणार!

  जीते रहो, लिखते रहो!
  दो दोस्त एक होके ऐसेही
  कामीयाबी छुते रहो
  और युही मुस्कुराते हुए,
  जीते रहो, लिखते रहो!

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s